Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणअस्वच्छ भिवंडीला सुंदर करण्यासाठी सरसावले चिमुकले हात.... शालेय मुलानी केला भिवंडी...

अस्वच्छ भिवंडीला सुंदर करण्यासाठी सरसावले चिमुकले हात…. शालेय मुलानी केला भिवंडी पुनर्निमाणचा निर्धार…

 

भिवंडी म्हटले की, अस्वच्छता… खराब रस्ते… रस्त्यावर कचरा पडलेला…धुळीने माखलेले आणि सदैव वाहतूक कोंडीत अडकलेले रस्ते…ना लोकाना फिरायला कुठली जागा…ना स्वच्छता… सगळीकडे प्रदुषण…या सगळ्या त्रासातून भिवंडीला सोडवण्यासाठी, इथल्या शहराला, माणसाना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी…नियोजनबध्द शहरासाठी आता भिवंडीतील शालेय मुलेच पुढे सरसावली आहे. शहरातील शाळकरी मुलांनी दुर्लक्षित भिवंडीचा अस्वच्छतेचा शिक्का पुसून टाकण्यासाठी शहरातील शाळकरी मुलाना आवाहन करीत येत्या रविवारी २० जानेवारीला भिवंडीत होत असलेल्या भिवंडी पुनर्निमाण कार्निव्हलमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शाळेतील मुलांबरोबर शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, मुलांचे पालक देखील चर्चेत सहभागी होत आहेत.

भिवंडीच्या सुधारणेवरून हताश झालेल्या भिवंडीतील नागरीक व नेते, अधिकारी अनेकांचे मत या शहराचे आता काही होणार नाही असेच मत झाले आहे. मात्र भिवंडीच्या नवीन पिढीला मात्र आपण ज्या शहरात राहतो ते आपले शहर सुधारण्यासाठी आपण पुढाकार घेतला, मनोवृत्ती बदलली तरच हे शहर बदलले जाईल असा आशावाद वाटत आहे. यासाठीच अंजूरफाटा-खारबाव रस्त्यावर असलेल्या पॉलीमथ इंग्लीश हायस्कूल या भिवंडीतील पहिली केंब्रीज मान्यता प्राप्त शाळेतील मुलानी शिक्षकांच्या मदतीने भिवंडीतील सर्व स्तरातील व्यक्ती, पालिका, पोलीस अधिकारी यांच्या भेटी घेतल्या. शहराबद्दल त्याना काय वाटते, शहर बदलण्यासाठी काय करावे याबद्दल मुलाखती घेतल्या. शाळेतील तिसरी ते सहावीच्या वर्गातील २० मुले या प्रकल्पात सहभागी झाले होते. भिवंडी शहराला लागलेला अस्वच्छ, नियोजन नसलेल्या शहराचा डाग घालवण्यासाठी केवळ आपले प्रयत्न अपुरे आहेत हे लक्षात आल्यावर पॉलीमथ शाळेतील मुलाना भिवंडीतील २० हून अधिका शाळेतील मुलांशी संपर्क साधला. त्याची परिणीती म्हणून रविवारी २० जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजता शाळेच्या आवारात आयोजित केलेल्या भिवंडी पुनर्निमाण कार्निव्हलमध्ये भिवंडी सुधारणा बद्दल शाळकरी मुलांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडीतील शाळातील सर्व विद्यार्थी, पालक याना या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन या मुलानी केले आहे. पॉलीमथ शाळेचे संचालक भावेश गांधी व हेमंत मेहता याबाबत माहिती देताना म्हणाले की, मुले म्हणजे या देशाचे, शहराचे भवितव्य आहेत. शहर बदलायचे, समाज बदलायचा असेल तर, त्यासाठी ही मुलेच आता पुढे आली आहेत. आपण राहतो ते शहर बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी भिवंडीवर प्रेम करीत असलेल्या प्रत्येकाला भिवंडी कार्निव्हलच्या या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन मुलानी केले आहे.

एक दिवसाच्या भिवंडी कार्निव्हलमध्ये सकाळी १० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत नृत्य, ड्राईंग, फॅन्सी ड्रेस, काव्य वाचन, जोक सांगणे, फोटोग्राफी अशा विविध स्पर्धा मुलांसाठी आयोजित केल्या आहेत. या कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या मुलाना प्रशस्तीपत्रक व विजेत्याना आकर्षक बक्षीसे मिळणार आहेत. यावेळी एका पेटींग वर्कशॉपचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दिवसभराच्या या कार्निव्हलमध्ये मुलांमध्ये साहसी खेळाची आवड व्हावी याहेतूने रॉक क्लाईंबिंग देखील असणार आहे. मातीच्या भांड्यांवर कलाकुसर शिकवणारे पॉटरी आर्ट, घरच्याघरी साबण व मेणबत्ती कशी बनवावी, कापडी पिशव्या बनवणे, स्पीन आर्ट, जिम्नॅस्टीकशी जवळीक साधणारे ट्रॅम्पोलिन, पाऊच पेटींग, वैज्ञानिक खेळ, मास्टर शेफ कॉम्पीटेशन असा भरगच्च खेळ व मजेचा कार्यक्रम दिवसभर पॉलीमॅथ शाळेच्या पटांगणावर रंगणार आहे. कार्निव्हलसाठी प्रवेश मोफत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments