Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमहिला बचत गटांना उद्योग जगतात वाव मिळण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशिल – उप महापौर हेमांगी वरळीकर

महिला बचत गटांना उद्योग जगतात वाव मिळण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशिल – उप महापौर हेमांगी वरळीकर

महिलांना उद्योग जगतात वाव मिळावायासाठी महापालिका प्रशासन दक्ष आहे. मुंबई शहरासह उपनगरांतही पालिका प्रशासनाने बचत गटाचे जाळे निर्माण करण्‍याचे मोठे काम केले असून महिलांना उद्योग जगतात आणण्‍याचे महत्‍वाचे काम महापालिका प्रशासनाने करतअसल्‍याचे प्रतिपादन मुंबईच्‍या उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर यांनी केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने सहाय्यक आयुक्‍त (नियोजन) विभाग आणि सहाय्यक आयुक्‍त ’ विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महिला बचत गटांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तुंचे भव्‍य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर यांच्‍या हस्‍ते आज (दिनांक १५ जानेवारी२०१९) काळा घोडाभुयारी मार्गफोर्ट येथे करण्‍यात आले.

याप्रसंगी जी/दक्षिण प्रभाग समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीमती किशोरी पेडणेकरमहिला व बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीमती स्मिता गांवकरस्‍थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप तसेच नियोजन विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर पुढे बोलताना म्‍हणाल्‍या कीमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात देशभरातून उद्योग करण्‍यासाठी नागरिक येत असतात. या उद्योगांवर येथे अनेक लोक आपली उपजीविका भागवित असतात. या शहरात उद्योग धंद्यात महिलाही मागे राहू नयेत म्‍हणून महानगरपालिका प्रशासन बचत गटांचे जाळे निर्माण करुन त्‍यांनाही प्रशिक्षण व उद्योगास चालना देण्‍यासाठी प्रेरित करण्‍यात येत आहे. महिल बचत गटांच्‍या उत्‍पादित वस्‍तुला वाव देण्‍यासाठी असे प्रदर्शन निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

बचत गटांच्‍या उत्‍पादीत वस्‍तू जनतेने अधिकाधिक विकत घ्‍याव्‍यातअसे आवाहन यानमित्ताने उप महापौर श्रीमती वरळीकर यांनी केले. फोर्टकाळा घोडा येथील भव्‍य प्रदर्शन व विक्री केंद्र दिनांक १७ जानेवारी२०१९ पर्यंत सुरु असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments