Tuesday, May 28, 2024
Homeकोंकणठाणेठाण्याच्या सौंदर्यीकरणात मराठी भाषा, सण, संस्कृती आणि साहित्यिकांना स्थान मिळावे; कोकण मराठी...

ठाण्याच्या सौंदर्यीकरणात मराठी भाषा, सण, संस्कृती आणि साहित्यिकांना स्थान मिळावे; कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखेची मागणी

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या ६२ वर्षानंतर यंदा प्रथमच राज्याला ‘ठाण्याचे मुख्यमंत्री' लाभले आहेत. याचा तमाम ठाणेकरांना नक्कीच अभिमान आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' हा उपक्रम राज्य सरकारच्या वतीने घोषित केला.

Thane City 
Kokan Marathi Sahitya Parishadठाणे शहराला सण, उत्सव, संस्कृती, परंपरा याबरोबच साहित्य, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचा मौलिक वारसा लाभला आहे. ठाण्याची दहीहंडी, नववर्ष स्वागत यात्रा,नवरात्रोत्सव, नारळी पौर्णिमा अशा विविध सण-उत्सवाने ठाण्याचे नाव ‘राज्याची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून देशपातळीबरोबरच जागतिक पातळीवरही नावाजले जाते . या सर्वांचे सुरेख प्रतिबिंब ठाण्यातील भिंतींवर चित्रीत व्हावे. त्यामुळे ठाणे शहराची कीर्ती देशपातळीवर नक्कीच गाजेल. तसेच या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श घेऊन राज्याच्या इतर शहरांमध्येही मराठीजनांना मानाचे स्थान मिळवून द्यावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने केली आहे. या मागणीचे निवेदन कोमसापच्या शहर कार्यकारिणीने ठाणेकरांच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले.

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या ६२ वर्षानंतर यंदा प्रथमच राज्याला ‘ठाण्याचे मुख्यमंत्री’ लाभले आहेत. याचा तमाम ठाणेकरांना नक्कीच अभिमान आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ हा उपक्रम राज्य सरकारच्या वतीने घोषित केला.

या उपक्रमांतर्गत ठाण्यातील प्रत्येक प्रभागातील शासकीय वास्तू, गृहसुंकुले, पदपथ, शाळा, कॉलेज यांच्या भिंती आकर्षक रंगसंगतीने रंगवून शहराचे सौंदर्यीकरण सुरू आहे. तरी या मागणीचा विचार व्हावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद ही मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. यासाठी संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रपतींना ७० हजार पत्रे पाठवून एक अभिनव उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेने राबविला. मराठीभाषेचा, संस्कृतीचा वारसा ठाण्यातील भिंतींवर चित्रीत व्हावा, यासाठी सदर निवेदन देण्यात आल्याचे कोमसाप शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य यांनी सांगितले.

आयुक्त श्री. बांगर यांच्या वतीने उपायुक्त जनसंपर्प अधिकारी प्रशांत रोडे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी रोडे यांनी या निवेदनाचा नक्कीच विचार होईल आणि सदर उपक्रमात कोमसापलाही सहभागी करून घेऊन असे आश्वासन दिले.

यावेळी कोमसाप शहर अध्यक्ष मनोज वैद्य, कार्याध्यक्षा नितल वढावकर, कार्यवाह अजित महाडकर यांच्यासह सदानंद राणे, साधना ठाकूर, पंकज पडाळे, प्रा. मनिषा राजपूत, राजश्री डोईफोडे, मेधा भावे, मनमोहन रोगे, मयुरी कदम, संध्या लगड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Thanyachya Saundaryikaranat marathi bhasha, san, sanskruti aani sahityikanna sthan milave; kokan marathi sahitya parishad, thane shakhechi maagani

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments