महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन कथा लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणण्यात येत आहे. ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ हा चित्रपट एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित झाला आहे आणि या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाला. अतिशय उत्सवात राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल उपस्थित होते. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी आणि निर्माती नीतू जोशी. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील पात्र अभिनेता जितेश मोरे यांनी केला आहे.
या भव्य कार्यक्रमात, अनेक विशेष लोकांची उपस्थित होती, ज्यात, मंत्री अनिल पाटिल, मंत्री अदिति सुनील तटकरे,आमदार संदीप धुर्वे,दिनेश वाघमारे, अभिमन्यु, आणि निशा जामवाल यांचे समावेश होता. नीतू जोशी यांनी सर्व अतिथींना पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. सर्वांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला.
प्रफुल पटेल म्हणाले, “मला माहित नव्हतं की बाबा अभिनय करू शकतात. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या देशाचं आणि ह्या राज्याचा हीरा लोकांना परियंत पोहोचायचं काम होतंय ह्याचा मनस्वी आनंद आहे. बाबा जी अहेरीचे राजा आहेत. अहेरी हे एक आदिवासी क्षेत्र आहे आणि ते त्याच्या राज कुटुंबातून आहेत. त्यांच वय अगदी १४ वर्ष असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला त्या नंतर खरा खडतर प्रवास हा बाबांचा सुरु झाला,आज ह्या स्थरापर्यंत येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलाय बाबांना. त्यांच्या जीवनातील विविध घटना या चित्रपटात दाखवला गेलाय.मी आज ट्रेलर बघुन खुप खुश आहे, पण चित्रपट अजून बाकी आहे. आम्ही सर्व काही त्याग करुन आज इथं परियंत आलोय आणि तपस्या केल्याशिवाय काही मिळाऊ शकत नाही. बाबा राज्याच्या मागासलेला व दुर्गम भागातुन आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासींच्या जीवनात किती मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलं आहे ये तेथील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. त्यांनी लाखों माणसांचे जीवन बदलले आहे. मी नितू जोशी यांना शुभेच्छा देतो.”
निर्माती नीतू जोशी यांनी म्हणाले, “या चित्रपटाचे तयार होण्याच्या काळात, मी बाबांना जवळुन ओळखलं, त्यांच्या संघर्षांना समजता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदान अनुभवलं. या चित्रपटातून मी नव्या पिढिला चांगले संदेश देण आणि त्यांना जीवनात उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते. बाबांच्या बाबतीतून काही सांगायला झाल तर.
मी नक्षलग्रस्त भागात गेले आणि बाबांबद्दल तेथील थरार सांगायला मिळाला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र १४ वर्षांच्या बाबांचा त्यांच्या संघर्ष आणि कामाचा आढावा ऐकून मी या चित्रपट बनवण्यासाठी निर्णय घेतला. या चित्रपटात, आदिवासी भागातून राज्य मंत्री बनण्याचं बाबांचं प्रवास दाखवलं आहे.”
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “मला नवीन जीवन मिळालं. नक्सलवादींच्या छापांपासून बाहेर पडलो, नदी नाल्यातून पाणी प्यायचो,माहित नव्हतं की जंगला बाहेर निघणारा की नाही. ह्या सर्व प्रवासाचं आणि संघर्षाची घटना चित्रपटातून दाखवला आहे.”
दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी म्हणाले, “आजही बाबा ह्या वयात प्रचंड उत्साहात असतात, आणि त्यांच्या उत्साह बघुन माझ्यावर असलेला प्रेशर हा थोडा कमी झाला. चित्रपटात जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र केलंय जितेश हा अतिशय अभ्यासु अभिनेता आहे त्यानी बाबांच आयुष्य खुप सुंदर रेखाटलय आपल्या अभिनयातुन . ह्या चित्रपटाचं निर्माण होन माझं स्वप्न होतं.”
अभिनेता जितेश मोरे म्हणाले, “मला हे पात्र साकारायला मिळणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्यचं म्हणाव लागेल कारण खुप संभाळून आणि अभ्यासपूर्व ह्यात मला काम कराव लागलं. मला शुटींग दरम्यान अनेक लोकांनी बाबांचा तरुण पानाचा संदर्भ दिला. तर ते रेखाटण्याचं दबाव वेगळा होता माझ्यासाठी, आणि दिग्दर्शकाने माझं काम खुप सोपं केलं.” या प्रसंगात, जितेश मोरे चित्रपटातील एका वाक्याचं उल्लेख केला,जे बाबांचं घोष वाक्य आहे, “जल,जंगल,जमीन हमारा है और ये जमीन मालीकाना हक़ हमारा अधिकार है.”
ही जीवन कथा ह्या नव्या पिढीला एक नवीन दिशा व ऊर्जा नक्कीच देईल अशी आशा आहे.
Web title: Praful Patel launched the trailer of Ebina Entertainment’s ‘Dharmarao Baba Atram’