मुंबई: एकीकडे शिवसेना सत्तेत असूनही भाजपवर टीका मारते आहे. मुख्यमंत्रीही शिवसेनेला शेलक्या शब्दात टोले लगावत आहे. पण असं असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी परवानगी न मिळालेल्या मातोश्री २ च्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मातोश्री या बंगल्याशेजारीच उद्धव ठाकरेंनी मातोश्री २ च बांधकाम चालू केलं होतं. हे बांधका बरेच दिवसांपासून रखडलं होतं मातोश्री दोनचं बांधकाम बरेच दिवसांपासून रखडलं होतं. या ८ मजली इमारतीतील २ मजल्यांच बांधकाम वादात अडकलं होतं.त्याला अधिक टीडीआर देण्यास महापालिकेने नकार दिला होता.त्यामुळे हे बांधकाम कसे पूर्ण होणार असा मोठा पेच पडला होता. पण आता मुख्यमंत्र्यांनी या बांधकामाला विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे. त्यामुळे रखडलेलं काम पुन्हा सुरू झालंय.