रायबरेली – उंचाहारमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) च्या ट्रायल यूनिटमध्ये बॉयलरची गॅस पाइपलाईन फुटल्याने आग लागून २६ जण ठार झाले. तर, काही जण गंभीर जखमी झाले. आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जखमींची रुग्णालयात भेट घेतली.
अपघातामध्ये मृत आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी राहुल गांधी रायबरेलीला गेले. रुग्णालयात राहुल गांधींनी जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. रुग्णालयातील डॉक्टरांचीही यावेळी राहुल गांधींनी भेट घेतली. गॅसचा पाईप फुटल्याने येथे मोठी आग लागली. त्यामध्ये ४ एजीएमसह १०० मजूर भाजले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा किमान २६ मजुरांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.