skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना टमरेल देणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

मुख्यमंत्र्यांना टमरेल देणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

महत्वाचे…
१.कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ २. राईट टू पी कार्यकर्त्या ताब्यात ३. मुंबईला हागणदारीमुक्त केले याचा निषेध


मुंबई : मुंबईमध्ये महिलांसाठी पुरेशा शौचालयांची संख्या कमी आहे. तरी सुध्दा मुंबईला हागणदारीमुक्त करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी राईट टू पी च्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षानिवासस्थानी भेटायला गेल्या असता महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारली. तरीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा या महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं. मुंबईत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, तरीही मुंबईला हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा छेडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments