महत्वाचे…
१.१५ व्या शतकातील पद्मावत काव्यावर पद्मावती हा सिनेमा आधारित. २.राणी पद्मावतीचा जोहर या सिनेमाची पार्श्वभूमी ३. सिनेमातील काही दृश्यांमुळे हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता
मुंबई: संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त पद्मावती सिनेमाची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली आहे.पद्मावती आधी १ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र वाढत्या विरोधामुळे आणि विविध संघटना,राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या धमक्यांनी हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता.
१५ व्या शतकात लिहिलेल्या गेलेल्या पद्मावत काव्यावर पद्मावती हा सिनेमा आधारित आहे. राणी पद्मावतीचा जोहर या सिनेमाची पार्श्वभूमी आहे. या सिनेमातील काही दृश्यांमुळे हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता. त्याविरूद्ध करणी सेनेने मोर्चाही काढला होता.याच संदर्भात हरियाणाच्या एका मंत्र्यांनी प्रसारण मंत्री स्मृती इराणींना पत्रही लिहिलं होतं. तसंच गुजरात निवडणुकांच्या तोंडावर वाद नको म्हणून या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं असल्याची चर्चा होते आहे. सेन्सॉर बोर्डाने ६३ दिवस परवानगी दिली नव्हती. आणि ६३ व्या दिवशी डॉक्युमेंट्स अपूर्ण असल्याचं सांगितलं. या सर्व घटनांमुळे अखेर निर्मात्यांनी पद्मावतीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.