मुंबई. भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या भारत सीमा सुरक्षा दलाच्या जवानासाठी गीत-संगीत रजनी कार्यक्रम कशिशचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थान, गुजरात च्या नारापेठ या सीमेवर,बाडमेर,गांधीनगर,भूज या ठिकाणच्या सीमांवर रक्षण करणाऱ्या ठिकाणी “कशिश” चे विशेष कार्यक्रम २३ ते २८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होणार आहे. टीव्ही वरील कहाणी घर घर की,घर एक मंदिर,कुमकुम आदी टीव्ही मालिकांमध्ये विविध मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम करणारा अभिनेता गौतम चतुर्वेदी यांनी संगीतमय कार्यक्रम “कशिश” चे आयोजन केले आहे. गौतम बरोबर प्रसिद्ध गायिका कनक चतुर्वेदी चा ही समावेश आहे. भारताच्या भारत-पाकिस्तान च्या सीमेवर विविध ठिकाणी या संगीत रजनीचे आयोजन केले जाणार असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी चतुर्वेदी यांना हिंदुस्तान पेट्रोलियम व गेल हे मदत करीत असतात.
कनक चतुर्वेदी “कशिश” च्या मुख्य गायिका असून गौतम चतुर्वेदी हे त्या मध्ये सूत्रसंचालनाची मुख्य भूमिका पार पडत असतात.“कशिश” चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा संगीत रजनीचा कार्यक्रम फक्त सैनिकांसाठीच असून सीमेवरील आणि विविध ठिकाणच्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सर्व प्रकारच्या रक्षणकर्त्या सैनिकांसाठीच आहे.या पूर्वी गौतम व कनक चतुर्वेदी यांनी नागराता,अखनूर, राजौरी,पुंछ व अगदी काश्मीर,लद्दाख च्या अत्यंत प्रतिकूल अशा जागी जाऊन सैनिकांचे मनोबल उंचावण्याच्या आणि त्याचे काही क्षण आनंदात जावे यासाठी त्यांचे मनोरंजन करण्याचे कार्यक्रम केले आहेत.