Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार!

विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार!

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी  विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, सपाचे आ. अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments