Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनराणी मुखर्जीच्या हस्ते शिक्षकांना 'हिचकी टीचर्स अवॉर्ड'

राणी मुखर्जीच्या हस्ते शिक्षकांना ‘हिचकी टीचर्स अवॉर्ड’

मुंबई: कोकुयो कॅमलिन लिमिटेड हा प्रीमिअर स्टेशनरी ब्रँड यशराज फिल्म्सच्या आगामी ‘हिचकी’ या सिनेमाशी जोडला गेला आहे. या सहयोगातून मुंबईतील २५० हून अधिक शाळांमधील ३०० हून अधिक शिक्षकांचा ‘हिचकी टीचर्स अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन शिक्षकांना गौरवण्यात आले. या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या हस्ते अंधेरीत यशराज फिल्म्स स्टुडिओज येथे झालेल्या कार्यक्रमात या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

या शालेय शिक्षकांसाठी या सिनेमाचा खास शोसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या शिक्षकांनी आपल्या शारीरिक समस्यांवर मात करत खंबीरपणे यशाची शिखरं गाठली आहेत, अगदी या सिनेमातील नैना माथुरप्रमाणे. या सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा नैना माथुर एक आनंदी महिला आहे. कधीही हार मानायची नाही, हे तत्व जपणाऱ्या नैनाला शिक्षक बनायचे असते. पण, तिला टॉटेट सिंड्रोम हा आजार आहे. मज्जा संस्थेशी निगडित या आजारात व्यक्तीचा हालचालींवर ताबा नसतो, एखादी हालचाल सतत होत राहते आणि त्यात टिक्स (उचकी) ही वाचेशी किंवा बोलण्याशी संबंधित समस्याही असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments