मुंबई : आजपासून होणा-या पाणीकपातीला महापालिकेनं आठवडाभर पुढे ढकलले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी देभरातून लाखो अनुयायी मुंबईत येत असतात. मुंबईत येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीसाठी महापालिकेनं 7 दिवस 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 3 ते 9 डिसेंबरऐवजी आता 7 ते 13 डिसेंबर अशी एक आठवडा पाणीकपात करण्यात येणार आहे. या दिवसांमध्ये पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पाणीकपातीच्या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. तथापि, दुरुस्ती कामाची आवश्यकता लक्षात घेता, नागरिकांनी कपात कालावधीत सहकार्य करावे तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.