Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रदलित IIT-मुंबई विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्येप्रकरणी आझाद मैदान येथे दलित, विद्यार्थी संघटनांतर्फे...

दलित IIT-मुंबई विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्येप्रकरणी आझाद मैदान येथे दलित, विद्यार्थी संघटनांतर्फे आंदोलन

देशात वाढत चाललेली जातीय विषमता, दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यावर होणारे अत्याचार याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि विविध दलित आणि विद्यार्थी संघटना यावेळी उपस्थित होते.

IIT-Bombay Sthdent Darshan Solanki Suicide Row Protest in Mumbai's Azad Maidan Dalit and Students Organisation मुंबईतील आझाद मैदान येथे शनिवारी विविध दलित आणि विद्यार्थी संघटनांतर्फे आयआयटी मुंबई येथील दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

यावेळी, ज्येष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई, आरपीआय सेक्युलर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड, आणि मृत दर्शन सोळंकी याचे कुटुंबीय उपस्थित होते.

देशात वाढत चाललेली जातीय विषमता, दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यावर होणारे अत्याचार याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि विविध दलित आणि विद्यार्थी संघटना यावेळी उपस्थित होते.

यावेळी, दर्शन सोळंकी याचे वडील रमेश सोळंकी यांनी आपल्या भावना व्यक्त करत ह्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

ते म्हणाले, “मी माझ्या मुलाला गमावले आहे. एक वडील होण्याच्या नात्याने कोणत्याही पित्यावर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून मी ह्या आंदोलनात सहभागी झालो आहे.”

या घटनेची चौकशी पवई पोलीस ठाण्यातील सध्याच्या अधिकाऱ्यांपेक्षा अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्याकडून करावी, अशी मागणी रमेश सोळंकी यांनी केली.

माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यावेळी म्हणाले, “आयआयटी सह महाराष्ट्रातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जाती-आधारित भेदभाव प्रतिबंधक विधेयक लागू करण्याच्या मागणीसाठी सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.”

“आयआयटी, आयआयएम आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यानी येऊच नये अशा प्रकारची मानसिकता उच्चवर्णीय आणि उच्च वर्गीय लोकांची आहे.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणाले, “जातीय भेदभाव ह्या देशात आधीपासूनच होता. पण, २०१४ ला मोदी सरकार आल्यापासून तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सरकार काहीच करीत नाहि हि अत्यंत खेदाची बाब आहे.”

आरपीआय सेक्युलर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड म्हणाले, “दर्शन सोळंकींची आत्महत्या नसून हि एक हत्या आहे. देशातील सत्ता हि मनुवादी लोकांच्या हातात गेली आहे. आणि त्यामुळे देशातील मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, भटके आणि विमुक्त, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात जातीय भेदभाव केला जातो,  त्यांचा प्रचंड प्रमाणात मानसिक छळ करून त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत ढकललं जातं.”

“जोपर्यंत देशातील सगळे शोषित समूह एकत्र येऊन संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत आपण ह्या परिस्थितीला उत्तर देऊ शकत नाहीत.”

दरम्यान, २०१४ पासून केंद्र अनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये १२२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून यातील बहुतांश विद्यार्थी एससी, एसटी किंवा ओबीसी समाजातील आहेत.

 

काय आहे दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण?

आयआयटी – मुंबई येथील B. Tech च्या प्रथम वर्षात शिकणारा १८ वर्षीय विद्यार्थी दर्शन सोलंकी याने ५ फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी, पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू ची नोंद केली आहे.

दर्शनच्या पालकांना यामध्ये त्याच्यावर जातीय भेदभाव केला गेला असून हि आत्महत्या त्याचमुळे घडली असल्याचा दावा केला आहे. “दर्शनने जातीभेदाबाबत तक्रार केली होती, पण कोणीही त्याचे ऐकले नाही,” असा दावा दर्शनचे वडील रमेश सोळंकी यांनी केला आहे.

दरम्यान, आयआयटी-मुंबईने एक निवेदन जारी केले आणि जातीय भेदभावाच्या बातम्यांचे खंडन केले. तसेच, आयआयटी-बॉम्बेच्या संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली होती.

महाराष्ट्र सरकारने २४ फेबुवारी ला याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: IIT-Bombay Student Darshan Solanki Suicide Row: Protest in Mumbai’s Azad Maidan by Dalit and Students Activists demanding Justice

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments