Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपच्या मंडळींनीच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव केला

भाजपच्या मंडळींनीच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव केला

eknath khadse criticizes bjp devendra fadnavis after exiting powerमुंबई : भाजपच्या मंडळीकडून विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडण्यात आले. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा याचमुळे पराभव झाला. असा खळबळजनक आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या लोकांची नावं पुराव्यासहीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे, असंही खडसे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. खडसे म्हणाले, परळीमध्ये पंकजांचा पराभव झालेला नसून पक्षातील लोकांनी केलेल्या कारस्थानामुळे त्या निवडणूकीमध्ये पडल्या. पक्षातील काही लोकांनी पंकजांविरोधात उभ्या असणाऱ्या धनंजय मुंडेंना मदत केल्याचा आरोप पंकजांचे कार्यकर्ते करत आहेत.

रोहिणी खडसेंविरोधात तर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काम केलं. मी स्वत: अशा अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो. मी या सर्वांची नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवली आहे. याला बराच काळ झाला असला तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसून त्यांच्यावर कारवाई होण्याची वाट पाहत आहे,” असं खडसे म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments