![Accident](https://mumbaimanoos.cdn-sigma.com/wp-content/uploads/2019/10/Accident.png)
या विषयी अधिक माहिती अशी की, घणसोली नवी मुंबई येथून तीन तरुण सातारा येथे मतदानासाठी आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास खासगी गाडीत जात होते. कामशेत बोगदापासून काही अंतरावर पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या मध्ये तीन तरुण ठार झाले.16 प्रवासी जखमी झाले.
बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहे.