Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमतदानासाठी जाणारे नवी मुंबईचे तीन तरुण अपघातात ठार

मतदानासाठी जाणारे नवी मुंबईचे तीन तरुण अपघातात ठार

Accidentमुंबई : नवी मुंबई येथून साता-याला मतदानासाठी जाणारे तीन तरुण अपघातात ठार झाले. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे झाला. खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावं आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, घणसोली नवी मुंबई येथून तीन तरुण सातारा येथे मतदानासाठी आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास खासगी गाडीत जात होते. कामशेत बोगदापासून काही अंतरावर पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या मध्ये तीन तरुण ठार झाले.16 प्रवासी जखमी झाले.
बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments