Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवारांची समजूत घालण्यासाठी पोलीस आयुक्त सिल्वरओक बंगल्यावर!

शरद पवारांची समजूत घालण्यासाठी पोलीस आयुक्त सिल्वरओक बंगल्यावर!

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय ( ईडीने ) गुन्हा दाखल केला. पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पवारांनी तूर्तास जाऊ नये यासाठी पोलीस आयुक्त संजय बर्वे पवारांची समजूत काढण्यासाठी पवारांच्या सिल्वरओक बंगल्यावर पोहचले आहेत.

राज्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे फोर्टच्या ईडी कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्ते जमले आहेत. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. त्यामळे कायदा सुव्यवस्था बिगडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झाले असून सरकारने सुडबुध्दीने कारवाई करत आहेत. असा आरोप सरकारवर लावण्यात आला आहे. ईडीनेही पवारांना मेल केला असून तूर्तास येऊ नका. अशी विनंती केली आहे. मात्र, पवार कोणत्याही परिस्थिती जाणार अशी माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments