Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेने केली शरद पवारांची पाठराखण; आव्हाडांनी मानले आभार!

शिवसेनेने केली शरद पवारांची पाठराखण; आव्हाडांनी मानले आभार!

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackerayमुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला. मात्र, कुठल्याही तक्रारीत नाव नसताना देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांवर गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पवारांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले. राऊत म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्रतीलच नाही तर देशातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व आहे. देशात अनेक नेते आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, चिंदंबरमही तुरुंगात गेले, पण त्यांचं प्रकरण वेगळं आहे.

कुठल्यातरी बँकेत कर्जवाटपासंबंधी घोटाळा झाला आहे, हे बरोबर आहे, त्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. पण, ज्या प्रकरणात शरद पवारांचं नावच आलं नाही, त्या प्रकरणात तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल कराल, तर लोकांच्या मनात शंका येणारच. शरद पवारच नाही, तर त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण असते, एकनाथ खडसे असते, देवेंद्र फडणवीस असते किंवा आमचा कुठला नेता असता आणि जर त्यांचं तक्रारीत नावच नाही, न्यायालयाच्या आदेशात नाव नाही, तरीही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हे चुकीचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये खळबळ माजणारच. जे पवार साहेबांच्या विचाराचे नाही, त्यांनाही यावर विश्वास बसत नाही. शरद पवार हे देशाच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत आहेत. त्यामुळे लोक त्यांच्याकडे त्या भावनेनी पाहातात असेही संजय राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments