Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसंभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू- प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkarमहत्वाचे….
१. भिडेंना नरेंद्र मोदींची फूस आहे की मोदींना भिडेंची फूस आहे, हे बघावे लागेल
२. भिडेंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे अटक झालीच पाहिजे
३. रावसाहेब पाटीलला अटक करावी. पाटीलने फेसबुकवरुन हिंसाचाराबाबत पोस्ट केली


मुंबई : संभाजी भिडे यांना आठ दिवसांत अटक करण्याचा अल्टिमेटम देतानाच भिडेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालू असा इशाराही दिला.

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, या मागणीसाठी सोमवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. सोमवारी दुपारी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. यानुसार आंबेडकर आणि त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले.

या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली. संभाजी भिडेंना अटक करावी. त्यांना अटक करण्यापूर्वी आधी रावसाहेब पाटीलला अटक करावी. पाटीलने फेसबुकवरुन हिंसाचाराबाबत पोस्ट केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हिंसाचारात बळींचा अपेक्षित आकडा गाठता आला नाही, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते, असे आंबेडकर यांनी सांगितले. भिडेंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तत्काळ अटक झालीच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत. आम्हाला मोदीशी भांडायचे नाही. पण कारवाई झाली नाही तर कोणत्या शेपटीवर पाय ठेवायचा आणि कोणतं प्रकरण कधी बाहेर काढायचे हे आम्हाला देखील समजते, असा सुचक इशाराच त्यांनी दिला. भिडेंविरोधात पुरावा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण त्यांच्याविरोधात ठोस पुरावे आहे, असा दावा त्यांनी केला.

जनतेसमोर सर्वांना झुकावे लागते. आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनाही झुकवू, असे त्यांनी सांगितले. भिडेंना नरेंद्र मोदींची फूस आहे की मोदींना भिडेंची फूस आहे, हे बघावे लागेल, असे त्यांनी नमूद केले. आठ दिवसात भिडेला अटक झाली नाही, तर पुढे काय भूमिका घ्यायची हे बैठक घेऊन ठरवू, असे त्यांनी सांगितले. सरकारला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा डाग पुसायचा असेल तर त्यांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments