Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्रवाहतूक पोलिसाच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले!

वाहतूक पोलिसाच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले!

जळगाव :  चाळीसगाव- औरंगाबाद रोडवर वाहनांची तपासणी करणाऱ्यासाठी गेलेले महामार्ग पोलिस कर्मचारी अनिल शिसोदे यांच्या अंगावर कंटेनर चालकाने कंटेनर घातल्याने शिसोदे जागीच ठार झाले.

वाहतूक हवालदार अनिल शिसोदे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर गस्तीवर होते. वाहनांची तपासणी करताना समोरुन येणाऱ्या कंटेनरला त्यांनी समोर उभं राहून अडवलं, मात्र कंटेनर चालकाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारात अनिल शिसोदे यांना कंटेनरचा जोरदार धक्का लागला आणि ते खाली कोसळले. यामध्ये शिसोदेंचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी चालक कंटेनरसह पळ काढण्याचा तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याला कंटेनरसह ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments