Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदर्भबुलडाणाशेतकऱ्यांनी दोन ट्रॉली ‘टोमॅटो’ फेकून केला आगळावेगळा निषेध!  

शेतकऱ्यांनी दोन ट्रॉली ‘टोमॅटो’ फेकून केला आगळावेगळा निषेध!  

Tomatoमहत्वाचे…
१.राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला
२.बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी भाजीपाला उपटून फेकून देत आहेत
३. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी दोन ट्रॉली टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला


बुलडाणा – राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकºयांनी दोन ट्रॉली टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला.

यावेळी रविकांत तुपकर व जवळपास १०० शेतक-यांना पोलिसांनी अटक व सुटका केली. संतापलेल्या शेतक-यांनी टोमॅटोचा ‘लाल चिखल’ करून भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत सरकारचा निषेध केला. मेहकर तालुक्यातील बोरी येथील संजाब आश्रु बचाटे या शेतक-याने शेतातील वांगी व टोमॅटोला बाजारात विक्रीसाठी नेले, मात्र बाजारात या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या या युवा शेतक-यांने शेतातील वांगी व टोमॅटोची झाडे अक्षरशा: कु-हाडीने तोडून टाकली. या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी शेतकºयांनी ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दोन ट्रॉली टोमॅटो आणून लोकांना फुकट नेण्याचे आवाहन केले; मात्र शेतकºयांचा हा भाजीपाला कोणी फुकटही नेत नसल्याचे पाहून अखेर शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो टाकून सरकारचा निषेध केला. ‘स्वाभिमानी’च्या या आनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टोमॅटो चा अक्षरश: सडा पडला होता.

हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्ते रविकांत तुपकर व शंभर शेतकºयांना ताब्यात घेतले. या आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी मुधकर शिंगणे, स्वाभिमानीचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, राणा चंदन, कैलास फाटे, भगवानराव मोरे, शे.रफीक शे.करीम, सतीश मोरे, दामोदर इंगोले, महेंद्र जाधव, निवृत्ती शेवाळे, नितीन राजपुत, अनिल वाकोडे, हरिभाऊ उबरहंडे, कडूबा मोरे, शे.सादिक, योगेश पायघन, अमिन खासब, अशोक मुटकुळे, सुधारक तायडे, सरदारसिंग इंगळे, मदन काळे, अमोल तेलंगरे, शशिकांत पाटील, दत्तात्रय जेऊघाले, शे.मुक्तार, मदन काळे, रामेश्वर परिहार, दीपक धनवे, भगतसिंग लोधवाळ, गोटु जेऊघाले, प्रेममसिंग धनावत, गणेश शिंगणे, डिंगाबर हुडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित  होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments