मुंबई : राणे कुटुंबीयांचा भाजप प्रवेश सोहळा लटकला आहे. मात्र नितेश राणेंना भाजप प्रवेशापूर्वीच भाजपचा एबी फॉर्म देण्यात आला. भाजपच्या या खेळीने मित्र पक्ष शिवसेनेलाही धक्का बसला आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला सेनेचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे भाजपने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
राणे कुटुंबियांनी कित्येक महिन्यांपासून भाजपाने प्रवेशासाठी होल्डवर ठेवले आहे. शिवसेनेचा तीव्र विरोध यामुळे भाजपची अडचण झाली आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला, आणि कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी भाजपचे एबी फॉर्म मिळवले. राणे कुटुंबिभायांच्या विरोधात कोकणात शिवसेनेने जोरदार विरोध सुरु केला आहे. आता नितेश राणे भाजपाकडून निवडणूक लढणार असल्यामुळे सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री नितेश राणेंनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ‘फक्त काही तास बाकी (वादळापूर्वीची शांतता)’, असं ट्वीट केल्यामुळे त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. काहींच्या मते हे राणेंच्या भाजप प्रवेशासंदर्भातलं ट्वीट होतं. मात्र, आता नितेश राणेंनाच भाजपचा एबी फॉर्म मिळाले असल्याचे समोर आले आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2019