Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमराठवाडालातूरमुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ विरोधात शिवसेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ विरोधात शिवसेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

Shiv Sena - BJPलातूर – लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला आहे. कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उमेदवारी विरूध्द रस्त्यावर उतरून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी अडवली.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मंगळवारी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून अखेर उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे स्थानिक आणि भूमिपुत्रांना संधी द्या, अभिमन्यू पवार यांची उमेदवारी मागे घ्या यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या सर्व गोंधळामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ जिंकला होता. तो अपवाद सोडला तर, या मतदरासंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे आता युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला हवा होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्यासाठी इच्छूक होते. अखेर शिवसेने औसा मतदारसंघ भाजपला सोडला. आणि पहिल्या यादीत अभिमन्यू पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले. परंतु आता विरोध झाल्याने येथील उमेदवार बदलता की नाराजांची समजूत काढता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments