Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेभाजपच्या नाराज आमदार मेधा कुलकर्णींना राष्ट्रवादी , मनसेची ऑफर !

भाजपच्या नाराज आमदार मेधा कुलकर्णींना राष्ट्रवादी , मनसेची ऑफर !


पुणे : कोथरूड मतदारसंघाच्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नाराज मेधा कुलकर्णी समर्थकांनी बंड पुकारला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने ऑफर दिली आहे. मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलते भाजपचेच काम करायचे आहे. त्यामुळे एकनिष्ठपणे पक्षाचे काम करु.

चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण रंगलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे. यामुळे कोथरूड मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments