Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईआज बाळासाहेब असते तर, आनंद झाला असता : शरद पवार

आज बाळासाहेब असते तर, आनंद झाला असता : शरद पवार

sharad pawarमुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली. आजचा दिवस पाहायला बाळासाहेब हवे होते. आज बाळासाहेब असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी या निवडीची घोषणा केली. महाराष्ट्राचा कारभार योग्यरितीने हाकण्यासाठी कर्णधार म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी सोपवत आहोत, असे शरद पवार म्हणाले. बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments