Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचा अघोरी प्रयत्नही फसला : संजय राऊत

भाजपचा अघोरी प्रयत्नही फसला : संजय राऊत

sanjay raut on bjpमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या हिताचा आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. भाजपाला राज्यात अघोरी प्रयत्न करूनही आपला निर्णय लादता आला नाही. अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

राज्यात अघोरी प्रयत्न करूनही भाजपाला निर्णय लादता आले नाही. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याविषयी रोष आहे. तसंच महाराष्ट्राच्या मातीत पुण्य शिल्लक आहे म्हणून आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. शिवसनेनेच्या हाती राज्याची कमान जाऊ नये म्हणून भाजपाकडून अनेक अघोरी प्रयत्न करण्यात आले. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो कधीही तुटणार नाही,” असं राऊत यावेळी म्हणाले.

उध्दव ठाकरे हे उद्यापासून राज्याचे मुख्यमंत्री असतील. ते आणि त्यांचे सहकारी राज्याचे निर्णय घेतील. माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कोणापुढेही झुकणार नाही. महाराष्ट्रानं देशाला नवा मार्ग दाखवला आहे. आमचं सूर्ययान २४ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षित उतरेल असं मी म्हटलं होतं. परंतु त्यावेळी लोकांनी चेष्टा केली. आता आमचं सूर्ययान सुरक्षितरित्या मंत्रालयात उतरलं आहे,” असं ते म्हणाले.

मी काही चाणक्य नाही. मी योद्धा आहे. शरद पवारही आता म्हणाले आपण दोघं दिल्लीत एकत्र जाऊ. यापूर्वी जेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर मी म्हटलं होतं की ते परत येतील. ते भाकित अगदी खरं ठरलं. शरद पवारांना समजण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील यापूर्वीच म्हणालो होतो. असंही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments