Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा रविवारी शपथविधी सोहळा

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा रविवारी शपथविधी सोहळा

Uddhav Thackeray will take oath as CM on Sunday
Image : Rajesh waradkar

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीची आज स्थापना करण्यात आली. महाआघाडीच्या नेतेपदी उध्दव ठाकरे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. येत्या एक डिसेंबरला रविवारी शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे.

ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाबतची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. उध्दव ठाकरेच महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील असेही पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले. आजच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments