मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. पोलिसांनी चारही नराधमांना बेड्या ठोकल्या. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे चार महिण्यांपूर्वी कुर्ला परिसरात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात तीन नराधमांनी ३५ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. नराधमांनी सलग दोन दिवस तिच्यावर अत्याचार केले होते.
पीडित महिला कानपूर येथून आली होती. २१ नोव्हेंबर रोजी ही महिला उड्डाणपुलाखाली जखमी अवस्थेत काही स्थानिकांना आढळली. त्यावेळी त्यांनी त्वरित पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली होती. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित महिलेला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
सोमवारी घडलेल्या बलात्कारातील गुन्हेगारांना बेड्या….
लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे. मात्र, या बाबत अद्यापही सविस्तर माहीती कळू शकली नाही.