Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईडोंबिवलीतही आढळला कोरोनाचा रुग्ण

डोंबिवलीतही आढळला कोरोनाचा रुग्ण

Corona patient found in Dombivaliडोंबिवली : कोरोनाने थैमान सुरुच असून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान, डोंबिवलीत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात सोमवार रात्रीपासून कोरोनाच्या १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सहा, सांगली मधील इस्लामपूरचे चार, पुण्याचे तीन, सातारा जिल्ह्यातील दोन तर अहमदनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे आठ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतीजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण….

पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे -१८
मुंबई – ४१
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली – ५
नागपूर, यवतमाळ,सांगली – प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे – प्रत्येकी ३
सातारा – २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण – प्रत्येकी १
एकूण – १०७
मृत्यू – ४

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments