Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेश14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

coronavirus pm narendra modi will address nation todayनवी दिल्ली : संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोना हा आगीसारखा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments