Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअमित शाहांचा शिवसेनेला 'मुख्यमंत्री' पद देण्यास नकार

अमित शाहांचा शिवसेनेला ‘मुख्यमंत्री’ पद देण्यास नकार

Amit Shahमुंबई : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देता येणार नाही, असे भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भाजपा अध्यक्ष अमित शाह हे राज्यातील पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्रात येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शाह या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणार नाहीत, असं आठवले यांनी सांगितले आहे. भाजपा-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीच हा पेच सोडवावा असे त्यांनी म्हटले असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.

आठवले यांनी सांगितले आहे की, दोन दिवस दिल्लीत असताना शाह यांच्याशी वादावर मी चर्चा केली. शाह म्हणाले, मी तिकडे येऊन काही फायदा नाही. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत मार्ग काढायला हवा. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. अन्य काही देण्याबाबत स्थानिक नेतेमंडळीच चर्चा करून मार्ग काढू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी संपूर्ण अधिकार दिले आहेत. असेही शाह यांनी आठवले यांना सांगितले. त्यामुळे हा वाद सुटण्याची शक्यता कमीच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments