Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअयोध्या प्रकरणी गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश

अयोध्या प्रकरणी गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Amit Shahमुंबई : अयोध्या प्रकरणी सुनावणी करणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश गोगोई यांच्याकडे कामकाजाचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलंय. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितलंय. गरज असेल तर संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अयोध्या खटल्याचा निकाल हा आता कधीही येऊ शकतो, त्यामुळे केंद्राकडून उपाययोजना सुरु झाल्या आहेत.

अयोध्या प्रकरणाचा निकाल हा ५ दिवसांमध्ये कधीही येऊ शकतो. उद्या म्हणजेच शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवार न्यायालयाचं कामकाज बंद असेल. यानंतर मंगळवारी १२ तारखेला गुरु नानक जयंतीमुळेही न्यायालयाला सुट्टी असेल. १८ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारणार आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले उत्तराधिकारी न्या. बोबडे यांच्याकडे अशा महत्वाच्या खटल्यांची यादी सोपवली आहे ज्यांची तत्काळ सुनावणी होणार आहे. यामुळे हे स्पष्ट होत आहे की, अयोध्या सारख्या संवेदनशील प्रकरणावर लवकरच निर्णय येऊ शकतो. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले होते की, निर्णय लिहिण्यासाठी कमीत कमी एक महिन्याची गरज आहे. दरम्यान, ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही दिवशी अयोध्येसह महत्वाच्या खटल्यांवर निर्णय येऊ शकतो.

हे पाच दिवस महत्वाचे…

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळात ८ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर या ५ दिवसांमध्येच न्यायालयाचं कामकाज सुरु असेल, त्यामुळे या ५ दिवसांमध्येच अयोध्या खटल्याचा निकाल कधीही येऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments