Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई ते अहमदाबाद रेल्वे ४० टक्क्यांहून अधिक रिकामीच!

मुंबई ते अहमदाबाद रेल्वे ४० टक्क्यांहून अधिक रिकामीच!

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी खर्च करण्यासाठी उत्सुक मोदी सरकारला धक्का देणारं वास्तव समोर आलंय.  मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यात गेल्या 3 महिन्यात ४० टक्के तर अहमदाबाद ते मुंबई ४४ टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत पुढे आलीये.  या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेस २९.९१ कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्याची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनजीत सिंह यांनी अनिल गलगली यांना १ जुलै २०१७ पासून ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतची माहिती दिली. यात मुंबई ते अहमदाबाद अशा ३० मेल एक्स्प्रेसने ४,४१,७९५ प्रवाशांनी प्रवास केला प्रत्यक्षात ७,३५,६३० सीट्स होत्या.एकूण महसूल रुपये ४४,२९,०८,२२० इतका येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपये ३०,१६,२४,६२३ इतकाच महसूल प्राप्त झाला.  १४,१२,८३,५९७ इतके आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान ३१ मेल एक्स्प्रेसची सुविधा असून३,९८,००२प्रवाशांनी प्रवास केला असून प्रत्यक्षात ७,०६,४४६ सीट्स होत्या. रुपये १५,७८,५४,४८९ रुपये इतके आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या पश्चिम रेल्वेस रुपये ४२,५३,११,४७१इतका महसूल अपेक्षित होता पण फक्त रुपये २६,७४,५६,९८२/- इतका महसूल प्राप्त झाला.

यात दुरोतों, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अहमदाबाद मंडळ अभियंताने अनिल गलगली यांना कळवले की, अहमदाबादसाठी नवीन गाडीचा कोणताही प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नाही. १२००९ शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे. त्यात अहमदाबाद येथे जाताना ७२,६९६ पैकी फक्त ३६११७ प्रत्यक्ष प्रवासी लाभले आणि रुपये ७,२०,८२,९४८ ऐवजी फक्त रुपये ४,११,२३,०८६ इतकीच कमाई झाली तर Executive चेअरच्या ८,२१६ पैकी 3,468 सीटसवर प्रवासी होते.  १,६३,५७,८९८ ऐवजी रुपये ६४,१४,३४५ कमाई झाली.

अहमदाबाद येथून मुंबईकडे परतताना १२०१० या शताब्दीमध्ये ६७,३९२ पैकी २२,९८२ सीट्सवर प्रवाशांनी प्रवास केला आणि रुपये ६,३९,०८,९८८ ऐवजी रुपये २,५१,४१,३२२ इतकीच कमाई झाली. तर Executive चेअरच्या ७५०५ पैकी फक्त १४६९ सीट्सवर प्रवासी होते ज्यांच्याकडून रेल्वेस रुपये १,४५,४९,७१४ ऐवजी रुपये २६,४१,०८३ महसूल प्राप्त झाला.  सर्व गाड्यांची स्थिती समान असून सर्वाधिक मागणी स्लीपर क्लाससाठी असताना त्याचा रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करत नाही.

अनिल गलगली यांच्या मते अहमदाबाद येथे जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही स्लीपर क्लास असून महाग तिकिटे असलेल्या गाड्यातील सीट्स शत प्रतिशत कधीच भरल्या जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार सोबत रेल्वे मंत्रालयाने या बाबीचा अभ्यास करण्याऐवजी बुलेट ट्रेन हा निवडलेला पर्याय सर्व सामान्य जनतेसाठी सोयीस्कर नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments