कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आणखी खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळने आजपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
पूर्वी २८ रुपये ५० पैशांनी खरेदी केलं जाणारं गायीचं दूध आता २६ रुपये ५० पैसे होणार आहे. अतिरिक्त दुधात वाढ झाल्यामुळे खरेदी दरात कपात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. लोणी आणि गाईच्या दुधाची पावडर स्वस्त झाली आहे. २२५ रू किलोची पावडर १७० रु किलोपर्यंत घसरली आहे. तर लोणी ४०० प्रती किलो वरून २७५ रु प्रति किलो एवढ्या खाली आला आहे. एकीकडे दूध संघाने खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. ग्राहकांना गायीचं दूध हे पूर्वीप्रमाणेच ४५ रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे.