Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस रद्द

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस रद्द

मुंबई – मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते दादर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या परळ, करी रोड येथील नवीन बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर गर्डर टाकण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ५ व्या मार्गावर सुद्धा सकाळी  १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ५ व्या लाईनवरुन मेल / एक्सप्रेस तसेच अत्यावश्यक असल्यास लोकल ट्रेन चालवण्यात येतात.
हार्बर रेल्वेमार्गावर कुठलाही मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने हार्बर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गेल्या रविवारी कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.
आज घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दादर येथून सीएसएमटीकडे जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागणार. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या दादर आणि कुर्ला स्थानकांपर्यंतच चालवण्यात येतील व तेथूनच ठाणे कल्याणच्या दिशेने सोडण्यात येतील. या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टच्या ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मेगाब्लॉकदरम्यान काही एक्सप्रेस गाड्या रद्द…
– सीएसएमटी – पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
– सीएसएमटी – मनमाड – सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस
– सीएसएमटी – पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन
– सीएसएमटी – मनमाड – सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
– सीएसएमटी – पुणे – सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
– सीएसएमटी – नागपूर – सेवाग्राम एक्सप्रेस
– सीएसएमटी – कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
ब्लॉकनंतर दादर येथून धीम्या मार्गासाठी पहिली लोकल दुपारी ३.३५ वाजता तर जलद मार्गासाठी पहिली लोकल दुपारी ४.३८ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून डाऊन धीमी लोकल दुपारी ३.५० वाजता तर डाऊन जलद लोकल दुपारी ३.४० वाजता सुटेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments