Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख'धोक्याची घंटा'

‘धोक्याची घंटा’

गुजरात आणि त्यानंतर राजस्थानमध्ये आलेले निकाल हे काँग्रेससाठी संजीवनी देणारे तर सत्ताधारी भाजपासाठी २०१९ करीता ‘धोक्याची घटां’ आहे. गुजरातच्या निवडणुका या ट्रेलर आणि राजस्थानच्या पोटनिवडणुका तर इंटरव्हल होता. आता संपूर्ण चित्रपट २०१९ ला पाहायला मिळणार अशी टीका एनडीएचा घटक पक्षातील शिवसेनेने केली. तर दुसरीकडे ‘आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीही (टीडीपी) ‘एनडीए’तून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष ‘एनडीए’ आघाडीतील प्रमुख घटकपक्षांपैकी एक आहे. सरकारने गेल्या चार वर्षात कोणतेही वचन पाळले नाही. जनता हैराण झाली आहे. सरकारच्या विरोधात वातावरण बनत चालला आहे. यामुळे जनतेलाही पुन्हा बदलाचे वारे वाहु लागले आहेत. याचाच अर्थ भाजपा सरकारसाठी ही ‘धोक्याची घंटा’ आहे. नुकताच बजेट सादर झाला. त्यामध्ये कागदोपत्री जे काही मांडण्यात आले तो आकड्यांचा खेळ आहे असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. अशा सर्व परिस्थितीत चार वर्षापासून सर्वच जाती जमातीची जनता हैराण आहे. यामुळे २०१९ मध्ये जनता भाजपाला सत्तेतून हाकलून लावले असे कालच राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणूकीच्या निकालावरुन स्पष्ट होते. राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता असून विशेष म्हणजे त्या जागा भाजपाच्याच होत्या. तरी सुध्दा तेथे काँग्रेसने बाजी मारली. अलवरमध्ये भाजपच्या हार मागे कथित गोरक्षकांचा उच्छाद मानला जात आहे. दूसरे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वतः जसवंत सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य. ‘तुम्ही हिंदू असाल तर मला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या’ असे ते म्हणाले होते. हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जर उमेदवार असा भेदवाभ करत असेल आणि मत मागित असेल तर कुणीही सहन करणार नाही. निवडणूका येतात जातात. पंरतु ज्या भागामध्ये सर्व जाती जमातीचे लोक पिढ्यानु पिढ्या राहतात त्यांच्यामध्ये दंगली लावण्याचे काम सत्ताधारी राजकीय पक्ष लावत असतील आणि धमक्या दिल्या जात असतील तर ती धर्मनिरपेक्ष जनता कधीही सहन करणार नाही.भाजपाने २०१४ मध्ये दिलेले एकही आश्वासन पाळले नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला परंतु तो अर्थ संकल्प पुढच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फक्त आकड्यांचा खेळ खेळला. खरतर त्या योजनांसाठी पैसा कसा उभारणार,शेतकऱ्यांना भाव कसा मिळणार,दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हटले होते आता ७० नोकऱ्या देऊ असे अनेक प्रश्नांचे त्यांच्याकडे उत्तर नाहीत. सर्वच वस्तूंचे दर वाढणार आहेत. एकीकडे रोजगार नाही. दुसरीकडे जातीय वादांमुळे जनताही हैराण झाली. पाच पंचवीस तरुण टवाळक्या करतात आणि त्याचे परिणाम सर्वजनतेला भोगावे लागतात. भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. जातीयव्देष पसरवुन विकास होत नाही. सर्वजाती धर्माच्या लोकांना गुण्यागोविंदाने जगू दिले तरच देशाचा विकास होतो. मात्र सत्तेसाठी भाजपा आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी जो उच्छाद मांडला तो देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी धोकादायक आहे. यामुळे २०१९ मध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments