Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रवरळी- सी लिंकला ओखीचा धोका नाही पोलिसांचे स्पष्टीकरण

वरळी- सी लिंकला ओखीचा धोका नाही पोलिसांचे स्पष्टीकरण

महत्वाचे…
१.मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले २. ओखी चक्रीवादळामुळे सी लिंकवर धोका असल्याची सोशल मिडियावर चर्चा होती ३.    समुद्रकिना-याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.


मुंबई – मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नसून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र हवामानाची स्थिती पाहून वाहतुकीसाठी सी लिंक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.  

दरम्यान, ‘ओखी’ चक्रीवादळामुळे ५ ते ७ डिसेंबरदरम्यान समुद्रात ५ मीटरपेक्षा उंच (भरतीच्या पाण्याची पातळी) लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिना-याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments