कांदिवली :देशाची आर्थिक राजधानी असलेल्या जागतिक दर्जाच्या मेट्रो शहर मुंबई सारख्या महानगरातील कांदिवली परिसरातील भीमनगर,गौतमनगर , लहुगड, गांधीनगर, रामगड, साताराकॅम्प, कैलाशपुरी, वाल्मीकि चाळ अश्या परीसरामधे आजही अँधारच अंधार आहे. या विषयावर या विभागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ नरवडे हे आपले सहकारी संजय बोर्डे , कैलाश म्हस्के,अविनाश राय, राकेश चवाथे,जीवन ब्रम्हाभट, अनवर शेख परसराम पाखरे , सौजरबाई मगरे, बाबू कांबले, मुकुंद भगत, फुलचँद पांडे, दयाशँकर शिंग, राधेशाम यादव यांच्यासह नालँदा बुद्ध विहार दामूनगर येथे शेकडो नागरिक उपोषणाला बसले आहे.
याबाबत माहिती अशी की कांदिवली परिसरातील वरील नमूद वस्त्यामधे ४०\४५ वर्षापासुन हजारो नागरिक राहतात परंतु आजही या भागामधे मूलभूत सुविधांचा अभाव आहे .आज पूर्ण महाराष्ट्र लोडशेडिन्ग मुक्त करायची भाषा बोलली जात असताना मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानी मेट्रो शहर मुंबई मधे आजही हजारो महिला व्रूद्ध बालके पुरुष हे विजेअभावि अंधारात चाचपडत जगत आहे.
वीज नसल्यामुळे रात्री घरामध्ये साप , विंचू , हीस्त्र पशु बिबट्या , तडस घुसतात आजपर्यंत साप चावल्याने ६लोकांचा म्रुत्यू झाला आहे व बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिक म्रुत्यूमुखी पडले आहे. वीज नसल्याने या परिसरात शिक्षण घेत असलेले हजारो विध्यार्थी समस्येचा सामना करत आहेत .त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे .अँधाराचा फायदा घेवुन या विभागात चोरी , घरफोडि , लूटमार अशी प्रकार वाढले आहेत.
नशेच्या आहारी गेलेले समाजकन्टक महिला व मुलींची छेड़छाड़ करण्याचे प्रकार वाढले आहे. विजअभावि या विभागात जे हाल होत आहेत याकडे ना सरकारचे लक्ष आहे ना प्रशासणाचे लक्ष आहे. या विभागातील लोकप्रतिनिधी निवडणुका आल्या की मोठमोठी आश्वासन देतात परंतु काही सुविधा पाहिजे असल्यास या ना त्या कारणाने त्या सुविधा मिळत नाही या गोष्टीचा बंदोबस्त व्हावा व नागरिकांना मूलभूत गरज म्हणून वीज मिळावी यासाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे.