Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रहार्दिक पटेल यांनी भाजपसोबत यावे- आठवले

हार्दिक पटेल यांनी भाजपसोबत यावे- आठवले

धुळे : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेससोबत जाण्याऐवजी भाजपा सोबत यावे, आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आगामी गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूकीत रिपाइं भाजपला पाठिंबा देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटीदार समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक विचार नक्कीच केला जाईल, परंतु हार्दिक पटेल यांनी भाजपसोबत यायला हवे़ राहूल गांधी यांचा प्रचार सुरू असला तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणार नाही़ लोकप्रिय बजेट मांडणार येत्या फेब्रवारीमध्ये सरकारकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प जनतेच्या फायद्याचे निर्णय घेणारा असेल. त्यामुळे तो लोकप्रिय ठरेल, असे आठवले यांनी स्पष्ट केले़ आतापर्यंत विकासाला आलेल्या अडथळयांना काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याची टिकाही त्यांनी केली़ ‘व्हाईट मनी डे’ साजरा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा क्रांतीकारी निर्णय घेतला़ या निर्णयाचा देशाला निश्चितपणे फायदा झाला आहे व होणार आहे़ तरी देखील काँग्रेसने ८ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे़ मात्र आपला पक्ष त्यादिवशी व्हाईट मनी डे साजरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सरकारचे अभिनंदन केले जाईल, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले़ पदोन्नती आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत दिले जाणारे आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले आहे़ परंतु त्याबाबत संसदेत कायदा करण्याची मागणी करणार आहे़ त्याचप्रमाणे सध्या असलेल्या ५० टक्के आरक्षणात वाढ करून ते ७५ टक्के करण्यात यावे व वाढीव आरक्षणात मराठा, पटेल, ब्राह्मण व अन्य समाजांचा समावेश करण्याची मागणी असल्याचेही रामदास आठवले म्हणाले़ संविधानात बदल केले जाईल, ही अफवा असून २०१९ मध्ये विद्यमान सरकारचाच विजय होईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला़.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments