Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसारा तेंडुलकरच्या नावाने शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारा जेरबंद

सारा तेंडुलकरच्या नावाने शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारा जेरबंद

मुंबई: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट उघडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. सायबर पोलिसांनी याप्रकरणी नितीन आत्माराम सिसोदे (वय ३९) याला अटक केली आहे.  नितीन सिसोदेला पोलिसांनी अंधेरी येथील लोकसरिता अर्पाटमेंटमधील फ्लॅटमधून अटक केली.

सारा सध्या शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाऊनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने एक बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले. इतकेच नव्हे तर ९ ऑक्टोबर २०१७ रोजी याच बनावट अकाऊंटवरून त्याने एक ट्विट केले, यामध्ये शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिले होते. दरम्यान, त्या कालावधीत सारा ही लंडनमध्ये होती, त्यामुळे सचिनच्या सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

ज्या मोबाइलवरून ट्विटर अकाऊंट काढण्यात आला होता, त्या मोबाइलचा आयएमइआय क्रमांक पोलिसांनी मंगळवारी शोधला. त्यावरून त्यांनी इंटरनेट पोट्रोकॉल (आयपी) अॅड्रेसही शोधला. आयपी अॅड्रेसवरून पोलीस नितीनच्या घरी पोहोचले. अटकेनंतर नितीनला किल्ला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात पोलिसांनी देवकुमार मैती नावाच्या एका व्यक्तीला पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथून अटक केली होती. देवकुमारने सारा तेंडुलकरला अपहरणाची धमकी दिली होती. या धमकीनंतर बांद्रा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments