skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रआयटीआयच्या सर्वच परीक्षा यापुढे होणार ऑनलाईन

आयटीआयच्या सर्वच परीक्षा यापुढे होणार ऑनलाईन

मुंबई – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील (आयटीआय) सर्व परीक्षा येत्या काळात ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. यासाठी राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने धोरण ठरवले असल्याची माहिती संचालक अनिल जाधव यांनी दिली.

ज्या आयटीआयच्या ३५ व्यवसायाच्या ऑफलाईन परीक्षा नुकत्याच पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या परीक्षाही ऑनलाईन पध्दतीने १७, १८, २० व २१ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहेत. या ऑनलाईन परीक्षांसाठी २२०० विद्यार्थ्यांना जिल्हा परीक्षा केंद्रांवरील आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत, अशी माहितीही जाधव यांनी दिली.
राज्यात प्रायोगिक तत्वावर फक्त जिल्हा स्तरावर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठी आवश्यक मॉक टेस्ट व ऑनलाईन परीक्षेबाबत मार्गदर्शन सर्व सबंधित विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत औधोगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक कालावधी देण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता संचालनालय घेत आहे. तर यापुढे सर्व स्तरावर सर्व सत्रांसाठी व सर्व व्यवसायाची ऑनलाईन परीक्षा सर्व सोयी सुविधांचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यासाठी धोरण ठरले असल्याची माहितीही जाधव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments