Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादराम मंदिरासाठी संसदेत कायदा पास करा-प्रविण तोगडिया

राम मंदिरासाठी संसदेत कायदा पास करा-प्रविण तोगडिया

औरंगाबादलवकरात लवकर राम मंदिरासाठी कायदा पास करा आणि विवादीत जागेवरचा राम मंदिराचा मार्ग मोकळा करा  असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी दिला आहे. तसंच ट्रिपल तलाकचं काय करायचं हा सरकारचा मुद्दा आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

देशातील जनतेने मत ही राम मंदिराच्या उभारणीसाठी दिले होते. ट्रीपल तलाख साठी नव्हे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.  संसदेत राममंदिरासाठी कायदा व्हायला हवा. हा कायदा झाल्यास राम मंदिर होईल. पण तसंच  मशीद उभी राहु शकणार नाही असं परखड मत विश्वहिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रविण तोगडीया यांनी व्यक्त केलं. तसंच यावेळी ओवैसी यांनाही त्यांनी टोला लगावला. हैद्राबादमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या कोणाविषयीही मी काही बोलणार नाही असं ते म्हणाले. देशातला सगळ्यात वादग्रस्त आणि जुना खटला असलेल्या रामजन्भूमीची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज सुरू होईल. आता पुढची सुनावणी 14 मार्चला होणार आहे. या प्रकरणाबद्दलच बोलताना कायदा पास करण्याची सुचना त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments