skip to content
Saturday, May 18, 2024
Homeदेशरेणुका चौधरी यांचा रिजिजू यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव

रेणुका चौधरी यांचा रिजिजू यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव

नवी दिल्ली – काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला आहे. रिजिजू यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून रेणुका चौधरी यांच्यावर झालेल्या टिप्पणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता.

रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘रेणुका चौधरी यांच्या चिडखोर हास्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले नाही.’ त्यानंतर रेणुका चौधरी यांनी हे वक्तव्य महिलेचा अपमान करणारे आणि अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच यावर आपण विशेषाधिकार प्रस्ताव आणणार असल्याचेही स्पष्ट केले.

बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान हसणाऱ्या चौधरी यांची तुलाना रामायणातील एका पात्राच्या हास्याशी केली होती. तसेच आपण असे हसणे रामायणानंतर आजच ऐकल्याचेही म्हटले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज १ तास पुढे ढकलण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments