मुंबई: आपण जे कमावतो त्यातील काही वाटा समाजासाठी खर्च करणे ही भारतीय संस्कृती आहे. समाजाप्रती असलेले आपले दायित्व ओळखत, सामाजिक जाणीव जपत समाजाला काही देण्याची भावना ही भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारे आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
१३ नोव्हेंबर रोजी ‘सिएसआर जर्नल एक्सेलन्स अवॉर्ड २०१७’ या कार्यक्रमात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, जो उत्तम काम करत समाजाला पुढे नेतो त्याला प्रोत्साहीत करणे समाजाला योग्य दिशा देणारे कार्य आहे. सिएसआर च्या माध्यमातून समाजसेवा करणा-या संस्थांना व व्यक्तींना पुरस्कृत करण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या संस्था व व्यक्तींना पुरस्कृत करण्यात आले.