गेल्या शनिवारी सलमान खान ‘वीकेण्ड का वार’मध्ये आला अन् नेहमीप्रमाणे त्याने घरातील सदस्यांचा क्लास घेतला. यावेळी पुन्हा एकदा सलमानने प्रियांक शर्माला खडेबोल सुनावले. घरातील त्याच्या एकूण वर्तनावर सलमान खूपच नाराज दिसला. त्यातच त्याचा पारा तेव्हा जास्त चढला जेव्हा बंदगी कारलाने सलमानला, प्रियांक मला समीर नावाने चिडवत असल्याचे सांगितले. बंदगीने म्हटले की, ‘सलमानने मला समीर नाव घेऊन चिडवले होते, परंतु प्रियांकने आता तो खूपच इश्यू केला. ते नाव घेऊन तो मला सातत्याने टार्गेट करीत आहे.
पुढे बंदगीने म्हटले की, मी प्रियांकसोबत या विषयावर चर्चा केली. तसेच त्याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपचे कारणही सांगितले. सर्व काही स्पष्ट केल्यानंतर प्रियांक वारंवार मला या नावाने चिडवत आहे.
बंदगीने सलमानला रडत रडत सांगितले की, माझे माझ्या बॉयफ्रेंडसोबत या कारणामुळे ब्रेकअप झाले की, तो मला त्याच्या मित्रांसोबत शेअर करू इच्छित होता. हे सांगताना बंदगीला रडू आवरणे अवघड झाले होते. यावेळी बंदगीने हेदेखील स्पष्ट केले की, पुनीशसोबत घरात मी जे काही करीत आहे, ते अजिबातच फेक नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रियांक बंदगीला समीर नावाने चिडवत आहे. मात्र बंदगी अतिशय धाडसाने तिच्या ब्रेकअपचे कारण जगजाहीर केले. बंदगीच्या या तक्रारीनंतर सलमानचा पारा आणखीनच चढला. त्याने प्रियांकला ताकीद देताना असे प्रकार करू नकोस, असा सज्जड इशारा दिला. परंतु प्रियांकने अशातही त्याच्या वागणुकीत बदल केला नाही. सलमान जाताच त्याने पुन्हा बंदगीला चिढविण्यास सुरुवात केली. यावेळी बंदगीने त्याला माझ्याशी पंगा घेऊ नकोस, असा दम दिला.
यावेळी सलमान खानने बंदगी आणि पुनीशचीही कानउघाडणी केली. त्याने दोघांनी स्वत:वर कंट्रोल ठेवण्याचा सल्ला दिला. सलमानने म्हटले की, हा शो त्यांचे आई-वडीलही बघत आहेत. त्यामुळे घरात अशी वर्तणूक ठेवा जेणेकरून तुमचे आई-वडील तुम्हाला स्क्रीनवर बघू शकतील. गेल्या काही दिवसांपासून बंदगी आणि पुनीशमधील जवळीकता जरा जास्तच वाढली आहे. घरातील लाइट बंद होताच दोघांमध्ये खूप काही चालत असल्याने प्रेक्षकांमध्येही त्यांच्याबद्दलचा संताप वाढत आहे. तर प्रियांक शर्मा जरा जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याचा त्याला फटका बसण्याची शक्यता आहे.