लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती

Iron man Sardar Vallabhbhai Patel's 144th birth anniversaryyy
भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती देशभर साजरी होत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. वकिली करत असताना महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. गुजरात येथील खेडा, बोरसद आणि बार्डोली गावातल्या गावकऱ्यांना संघटित करुन त्यांनी इंग्रजांविरोधात सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारत छोडो आंदोलनातही सरदार वल्लभभाई पटेल आघाडीवर होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री हे पद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भुषवले. देशाची फाळणी झाल्यानंतर जो हिंसाचार उफाळला होता. त्या हिंसाचारानंतर शांतता प्रस्थापित करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मुत्सदेगिरीसाठी ते प्रसिद्ध होते. अनेक संस्थाने त्यांनी भारतात विलीन केली आणि त्याचमुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते.

 pm narendra modi sardar vallabhbhai patel anniversary
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्यलढ्यात सरदार पटेल यांचा मोठा वाटा होता. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून गेल्या वर्षी त्यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी उभारण्यात आला. या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठा आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

Senior NCP leader Chhagan Bhujbal admitted to hospital
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भुजबळांना सतच्या दौ-यांमुळे प्रकृतीवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे भुजबळ हे पूर्वी तुरुंगात होते तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली होती. अचानक त्यांची प्रकृती ढासळली असून, त्यांना उपचारासाठी जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गर्दी केली असून, त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना बच्चा पार्टी नाही : संजय राऊत

sanjay raut shivsena
मुंबई : सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. शिवसेनेनं कुठलंही पाऊल मागे घेतलेलं नाही. जर शब्द दिला आहे तर भाजपनं युती धर्माचं पालन करावं. राजकारणात सर्वांना सर्व पर्यायं खुलं आहे. भाजपाकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी सत्तास्थापन करावा असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.

विधानसभेच्या निकालाला आठ दिवस उलटून युतीच्या सत्तास्थापनेचा पेच कायमं आहे. शिवसेना सत्तेच्या समसमान वाटपावरून ठाम आहेत त्यामुळे सत्तास्थापनेसाठी युतीत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना गटनेता निवडण्यासाठी आज बैठक घेणार आहेत. बुधवारी भाजपाने देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांची गटनेतेपदी निवड केली. परंतु युतीकडे सत्तास्थापन करण्या इतका आकडा असतांनाही सत्तेच्या वाटपावरून शिवसेना आक्रमक झाली आहे.

शिवसेना आक्रमक असल्यामुळे भाजपचे नेतेही आमक्रम होतांना दिसत आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनीही आम्हालाही पर्यायं उपलब्ध असल्याचे विधान बुधवारी केले. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाब तंत्र टाकण्यात येत असल्याच चित्र सध्या तरी दिसून येतं आहे.

पुण्यात राष्ट्रवादीकडून चक्क चंपा साडी ‘हाय हाय’च्या घोषणा

0

ncp chandrakant patil bjp sarees
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमध्ये साडी वाटप केल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. ‘चंपा साडी हाय हाय’, ‘आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी’ अशा घोषणा देण्यात आलं.

डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. भाजपाच्या साडी वाटपाला विरोध दर्शवला. कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊ बीज सणाच्या निमित्ताने एक लाख महिलांना साडी वाटप केलं. त्यावेळी पाटील यांच्या या उपक्रमाचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेकडून निषेध नोंदविण्यात आला होता. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

पूर्वी काका-पुतण्याचा संघर्ष, आता भावा-बहिणीचा संघर्ष सुरु : अजित पवार

ajit pawar Pankaja Munde
मुंबई : पूर्वी काका-पुतण्याचा संघर्ष होता. आता भावा-बहिणीचा संघर्ष सुरु आहे. त्या तुलनेत आमच्या बारामतीत बरं चालू आहे. असा टोला अजित पवारांनी पंकजा मुंडे यांच नाव न घेता लगावला.

मतदानाच्या दोन दिवसआधी धनंजय मुंडे यांच्या व्हीडीओ क्लीपमध्ये छेडछाड करुन व्हायरलं करण्यात आली होती. औरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यावरून अजित पवारांनी हे विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, राजकारणात असं घडलं असतं तसं घडलं असतं याला अर्थ नसतो. मॅजिक फिगर महत्वाची असते. जनतेने आता कौल दिलाय. सत्ताधाऱ्यांना या दिवाळीत गोडधोड खाता आलं नाही. आपण मात्र समाधानी आहोत. यापुढे बेरोजगारी, शेतीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडू असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार

Ajit Pawar Legislative leaders
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार हे विरोधी पक्षनेते होणार आहेत.

जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. तसेच पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नसल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, “आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत.”

सहकारी सोडून गेले नसते तर सरकार आपले सरकार आले असते. जे गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांचे कौतूक केले. ज्या उमेदवारांचा पराभव झाला त्यांच्याशी भेट घेऊ. आपण कुठे कमी पडलो याबाबत चर्चा करु. पुन्हा जोमाने कामाला लागू असेही अजित पवार म्हणाले. प्रचाराला अजून एक आठवडा मिळाला असता तर आपलं सरकार आलं असतं. असेही अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, जे जे शक्य होईल ते करणारच

uddhav thackeray shivsena
मुंबई : भाजपा आणि शिवसेनेमध्ये सध्या सत्तेच्या वाटपावरून वाद सुरु आहे. या सगळ्या घडामोडींवर बोलताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. सत्ता स्थापनेवरुन पत्रकारांना उत्तर देताना सांगितले की, जे जे शक्य होईल ते करणारच.

आज विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड केली. शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा फडणवीस यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर तडजोड करण्यास तयार नसल्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. ‘सत्ता स्थापनेसाठी जे जे शक्य होईल ते करणारच’ असं वक्तव्य करुन उद्धव यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाने अद्याप शिवसेनेशी संपर्क केलेला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

चर्चा झाली नाही तर मजा येत नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis bjp shivsena
शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरून आक्रमक झाली आहे. जो पर्यंत चर्चा होणार नाही तो पर्यंत पुढील चर्चा नाही. असा पवित्रा घेतलेला असताना आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. यावेळी फडणवीस म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. चर्चा झाली नाही तर मजा येत नाही.

पुन्हा निवडून आल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. यंदा भाजपामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी निवडून आले. हे सर्वस्पर्शी, सर्व्यवापी सरकार आहे. आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आहे असे ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बोलून दाखवला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचं योग्य नियोजन करुन वाहून जाणारे पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं. पुढे सुद्धा असचं काम चालू ठेवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

गेल्या पाच वर्षात दीनदलित, गोरगरीब, मराठा समाज प्रत्येक समाजाच्या आशा, अपेक्षा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही बाकी राहील असेल तर ते पूर्ण करण्याची ताकत आपल्यात आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करु शकलो हे आपले यश असल्याचे फडणवीस म्हणाले.

जीवेत् शरदः शतम्

anilkumar-gaikwad-birthday
निलंगा पंचायत समिति चे सभापती अजित माने, भाजप जिल्हा उपध्याक्ष बालाजी पाटिल

हवाओ में खुशबू बनकर बिखर जाते है,
वो इंसान के रूपमे फ़रिश्ते बनकर निखर जाते है|

कीर्ती रूप, अनिलकुमार गायकवाडांसाठी शब्द सुमनांची वोन्ज आहेत. ज्या माणसानं सत्कर्म अंगिकरून सामाजिक वसा जोपासला, अनाथांचा नाथ बनला. अशा थोर कीर्तीच्या या अवलीया समाजात खूप कमी जन्माला येतातं. या अवलीयांची किर्ती खूप महान असते, तेच गुण आमचे अनिलकुमार गायकवाड अण्णा यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा कदापी विसरण्या जोगे नाही.

त्यांच्या कार्याची हातोटी म्हणजे ‘ मरावे परी कीर्तिरूपे उरावे ‘ अशीच आहे. आज अण्णांचा वाढदिवस. यानिमित्ताने आमच्या काळजातल्या कायमस्वरूपी घर करून बसलेल्या या मानवरूपी फरीस्त्याला काळीज भरून शुभेच्छा !अण्णांना समाजसेवचं व्रत त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना मिळालं. त्यांच्या वडिलांचे दिनदुबळ्यांसाठी केलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. तोच वसा घेऊन अण्णा हे समाजात वावरत आहेत.

नेहमीच गरिब,बेरोजगार,विधवा,कष्टकरी,अनाथांसाठी दिवसंरात्र त्यांना मदतीचा हात देणारे अण्णा व्यक्ती समाजातं खूप कमी प्रमाणात असतातं. आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वत:च्या कल्याणासाठी धावपळ करत असतो. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच व्यक्ती असतात जे इतरांसाठी जगतात. आणि त्यांना मायेची ऊब देतात. त्यांच्या या मेहनतीचं जेवढ कौतूक केलं तेवढ कमीचं आहे. ती अवलीया व्यक्ती म्हणजेच आमचे अण्णा…!

अण्णांना आमचंही आयुष्य लाभो हीच मंगलमय प्रार्थना!

चक्क १२५ रूपयांचं नाणं

Central government issued a coin of 125 rupees paramhansa yoganandas 125 anniversary
नवी दिल्ली : जनतेसाठी केंद्र सरकारने चक्क १२५ रूपयांचं नाण आणलं आहे. सेल्फ-रियलायजेशन फॅलोशिपचे संस्थापक योगी परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून १२५ रूपयाचे नाणे जारी करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीमध्ये १२५ रूपयांचे नाण्याचे लोकार्पण केलं. यामुळे आता बाजारात १२५ रुपयाचे नाणे व्यवहारात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन नाण्याचं लोकार्पण करताना म्हणाल्या की, ‘परमहंस योगानंद यांनी जगभरात भारताची मान उंचावली. त्यांनी जगभरातील लोकांना मानवतेविषयी जागृत करण्याचं काम केलं. जगभरातील लोकांना एकतेविषयी संदेश दिला. यावेळी अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.

Central government issued a coin of 125 rupees paramhansa yoganandas 125 anniversary
१२५ रूपयाच्या नाण्यात काय आहे विशेष…

१२५ रूपयाच्या विशेष नाण्याच्या समोरील बाजूला अशोकचक्र हे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. हिंदीमध्ये भारत तर इंग्रजीमध्ये इंडिया सह १२५ रूपये छापलं आहे. या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला परमहंस योगानंद यांचे छायाचित्र छापले आहे. त्यासोबतच हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘परमहंस योगानंद यांची १२५ वी जयंती’ आणि त्यांच्या जन्म-मृत्यूचं वर्ष नमूद करण्यात आलं आहे. ३५ ग्रॅमचं हे विशेष नाणं तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, पाच टक्के निकल आणि पाच टक्के जस्तचा वापर केला आहे.