शिवसेनेला पंधरा, तर भाजपला चार जिल्ह्यात नो एंट्री !

shiv sena fifteen and bjp has no entry in four districts
युती सरकारने पाच वर्षात राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केला. विकासात्मक कामे केली नाही. त्यामुळे युती असूनही दोन्ही पक्षांच्या जागा घटल्या. शिवसेनेला तब्बल पंधरा, तर भाजपला चार जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यातील मतदारांनी या दोन्ही पक्षांना नो एंट्री असल्याचे दाखवून दिले.

भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसला आहे. पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. भाजपवर तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच हद्दपार होण्याची नामुष्की ओढवली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या भाजपच्या हातात असलेल्या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.

भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार होते. भाजपने तिन्ही विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र भाजपला तिन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. परिणय फुकेंनाही हायप्रोफाईल लढतीत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून पराभव स्वीकारावा लागला.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने तीन जागा टिकवल्या आहेत. मात्र माकप आणि राष्ट्रवादीने भाजपच्या दोन्ही जागा खेचून आणत पालघरातून भाजपचं संस्थान खालसा केलं आहे. रत्नागिरीत भाजपने एकही जागा लढवलेली नव्हती.

अमरावतीत भाजप चार जागांवरुन एकावर घसरली आहे, तर गोंदियात तीन जागांवरुन भाजपची एकावर घसरण झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या तीन जागांपैकी एक जागा भाजपच्या हातून निसटली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात भाजप चारवरुन निम्म्या जागांवर आली.

नांदेडमध्ये भाजपकडे एक जागा होती, ती वाढून दोनावर गेली आहे. मात्र विधानसभेच्या नऊ जागा असलेल्या नांदेडमध्ये भाजपचा खासदार असूनही दोन जागांवरच भाजपला समाधान मानावा लागला. परभणीत भाजपने खातं उघडत एक जागा मिळवली, ती रासपमधून आलेल्या मेघना बोर्डीकरांच्या जोरावर. तर हिंगोलीतही भाजपला एकच जागा मिळाली आहे.

अहमदनगरमध्ये विखे पाटील पिता-पुत्रांनी बाराही जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदेंना पराभवाची धूळ चारलीच, सोबत भाजपला पाच जागांवरुन तीनावर आणून ठेवलं.

बीड आणि सांगलीमध्येही भाजप चार जागांवरुन दोनावर आली आहे, तर लातूरमध्ये भाजपच्या वाट्याला दोनच जागा आल्या आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबादमध्ये भाजपने अनुक्रमे एक, एक आणि दोन जागा मिळवत खातं उघडलं तेही चार आयाराम आमदारांच्या बळावर.

शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. शिवसेनेला विदर्भात मोठं फटका बसला. वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भातील आठ राज्यांमध्ये एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. बुलडाण्यात दोन तर यवतमाळ-अकोल्यात सेनेचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला आहे. म्हणजेच विधानसभेच्या 62 जागा असलेल्या 11 मतदारसंघात सेनेचे केवळ 4 आमदार आहेत.

विदर्भातील आठ राज्यात नंदुरबार, धुळे, जालना, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर या सात, मतदारसंघात एकूण 15 जिल्ह्यांत शिवसेनेला खातं उघडता आलेलं नाही. नांदेड, हिंगोली, परभणी, पालघर, सांगलीमध्ये प्रत्येकी एक, तर नाशिक-साताऱ्यामध्ये प्रत्येकी दोनच जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

औरंगाबादमध्ये मात्र नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. मुंबई (13) आणि ठाणे (05) नंतर औरंगाबादेतच शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली आहे.

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला 21 पैकी केवळ सहा जागाच युतीकडून सोडण्यात आल्या होत्या. परंतु शिवसेनेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही. दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही कशीबशी एक जागा टिकवून ठेवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि रत्नागिरीत मिळून शिवसेनेचे निम्मे आमदार आहेत.

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा

nawab malik NCP support for Shiv Sena to power
शिवसेना-भाजपचे 50-50 फॉर्म्युल्यावरून सत्ता स्थापनेवरून घोडे अडले. समसमान वाटपावरून शिवसेना ठाम आहे. राज्यात पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ नये, म्हणून शिवसेनेला वेळप्रसंगी राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकते. असे राष्ट्रवादीचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप आज विधीमंडळाचा गटनेता निवडणार आहे. भाजप अपक्षांच्या भरवशावर सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. परंतु, भाजपला विधिमंडळात बहुमत सिध्द करावे लागेल. भाजपाकडे बहुमत नाही त्यामुळे पुन्हा राज्यावर निवडणुका लादणे चुकीचे होईल. हे टाळण्यासाठी अशा वेळी पर्याय म्हणून आम्ही शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलीक यांनी दिली.

शिवसेना 50 – 50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असून, जो पर्यंत या बाबत निर्णय होत नाही तो पर्यंत कोणतीही चर्चा नाही. या भूमिकेवर शिवसेना ठाम आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा पेच आणखीनच वाढला आहे. भाजपा हा मोठा पक्ष असला तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. शिवसेनेच्या भुमिकेमुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत खलबते

congress mumbai MLA ashok chavan balasaheb thorat
काँग्रेसच्या नवर्निवाचीत आमदारांची बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण यावर चर्चा होणार आहे. तर शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी पाठिंब्याबाबत खलबते होणार आहे.

राज्यात सत्तासंघर्षावरून सध्या भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांमधून वाद सुरु आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी प्रस्ताव दिला तर विचार करु असे काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्या बाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची चर्चा होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोण विराजमान होणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.

शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत.

भाजप आज विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार

Narendra Singh Tomar and devendra fadnavis bjp meeting
भाजपा शिवसेनेमध्ये सत्तेच्या वाटेवरून रस्सीखेच सुरु आहे. मात्र, भाजपची आज बैठक होत असून या बैठकीत भाजप आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे.

आज होणा-या बैठकीत भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहाणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणताही शब्द दिला नव्हता. असे स्पष्ट केले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदावरून आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अद्यापही कोणतीही बैठक झाली नाही.

दुसरीकडे भाजप अपक्षांचा पाठिंबा घेऊन शिवसेनेवर दबावतंत्राचा राजकारण करत आहे.
भाजपचे नेतेही मुख्यमंत्री पाच वर्ष शिवसेनेचाच राहिल अशी विविध विधाने करुन शिवसेनेला डिवचण्याचे काम करत आहेत. यामुळे दोन्ही पक्षात वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.

रायगडावर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी : खासदार छत्रपती संभाजीराजे

सांगली: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल, एक तरी कॅबिनेटची मिटिंग ही रायगडावर घ्यावी, असा प्रस्ताव कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ठेवला आहे.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभववर माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने सांगतो, ‘छत्रपती उदयनराजे यांचा पराजय म्हणजे, तो आमचा पण पराजय आहे, मनापासून आम्हाला दुःख वाटतंय.
छत्रपती खासदार संभाजीराजे म्हणाले की, नवीन आमदारांना विनंती, गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही, असं देखील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना रणनीतीकार प्रशांत किशोरवर नाराज

0

prashant kishor shiv sena bjp
मुंबई : शिवसेनेच्या जागा घटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये निवडणूक प्रचार रणनीतीकर किशोर यांच्या बाबत नाराजीचा सूर उमटला आहे.

प्रशांत किशोर यांचा 2014 मध्ये मोदींच्या यशामध्ये तसेच बिहारमध्ये लालू प्रसाद- नितीश कुमार यांच्या आघाडीच्या यशामध्ये सिंहाचा वाटा होता. प्रशांत किशोर हे जेडीयूचे उपाध्यक्ष असून शिवसेनेच्या प्रचाराचे रणनीतीकार होते. मात्र, शिवसेना भाजपा युती असताना सुध्दा शिवसेनेला फटका बसला. आमदरांच्या संख्येत घट झाली.

दोन्ही पक्षाच्या जागा कमी झाल्या. शिवसेनेच्या एकूण शिवसेनेसाठी यंदा रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. किमान ७५ आमदार निवडून आणण्याचा I-pac चा उद्देश होता. परंतु त्यात यश आले नाही.

मुख्यमंत्रीपदाच्या गोंधळात आठवलेंना हवंय दोन मंत्रीपद

ramdas athawale
मुंबई : मुख्यमंत्रीपदावर शिवसेना आक्रमक झालेली असताना महायुतीमधील घटकपक्ष रिपाईला दोन मंत्रीपद पाहिजेत. अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महायुतीमध्ये रिपाईला चार जागा सोडण्यात आल्या होत्या. परंतु रिपाईचा एकही उमेदवार निवडूऩ आला नाही. आता आठवलेंनी रिपाईसाठी एक कॅबिनेट, एका राज्यमंत्रीपद मागितले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. त्यावेळी मंत्रीपदावर चर्चा होईल असेही ते म्हणाले.
महायुतीमध्य शिवसेना, भाजपात वाद सुरु असताना आता मित्र पक्षांनी तोंडवर केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

दिवाळीचा दिलासा : रविवारचा रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

0

Railway Megablock cancel
मुंबई : दर रविवारी दुरूस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. परंतु, दिवाळीनिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीचा प्रवाशांचा दिलासा मिळाला आहे.

दर रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक घेतला जात होता. मात्र, सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. त्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवाशांची अडचण होणार नाही याची जवाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.

विधानसभेत यंदा 24 महिला आमदारांची झेप

24 women MLAs in the Assembly this time
महाराष्ट्र विधानसभेसाठी ३ हजार २३७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी २३७ महिला उमेदवार होत्या. २३७ मधून 24 महिला उमेदवार विजयी झाल्या असून, त्यांनी विधानसभेत झेप घेतली.

महाराष्ट्रात आतापर्यंत विधानसभेच्या १३ निवडणुका झाल्या आहेत. त्यात आतापर्यंत ३ हजार ७४४ आमदार विजयी झाले. यापैकी १६० महिलांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. विशेष म्हणजे सर्वाधिक 24 महिला यंदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

महिला आमदारांचा आकडा गेल्या ५७ वर्षांचा १६० पर्यंत गेला आहे. १९७२ मध्ये ५६ महिलांनी रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यावेळी एकही महिला उमेदवाराचा विजया झाला नव्हता. त्यामुळे १९७२ च्या विधानसभेत पुरुषांचाच बोलबाला होता. १९७८ ला सर्वात कमी अर्थात ५१ महिलांपैकी ८ विजयी झाल्या होत्या.

24 महिला आमदार…

नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप)
देवळाली – सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
चोपडा – लताबाई सोनवणे (शिवसेना)
साखरी – मंजुळा गावित (अपक्ष)
पाथर्डी – मोनिका राजळे (भाजप)
चिखली – श्वेता महाले (भाजप)
अमरावती – सुलभा खोडके (काँग्रेस)
तिवसा – अॅड.यशोमती ठाकूर (काँग्रेस)
वरोरा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
पर्वती – माधुरी मिसाळ(भाजप)
कसबा पेठ – मुक्ता टिळक (भाजप)
सोलापूर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
तासगाव – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
मीरा – भाइंदर-गीता जैन (अपक्ष)
भायखाळा – यामिनी जाधव (शिवसेना)
बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)
दहिसर – मनीषा चौधरी (भाजप)
गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवा – भारती लव्हेकर (भाजप)
जिंतूर – मेघना बोर्डीकर (भाजप)
केज – नमिता मुंदडा (भाजप)

शिवसेनेच्या आक्रमकतेनंतर भाजपाच्या गोटात धाकधूक

0

Shiv Sena BJP, BJP, Devendra Fadnavis, Uddhav Thackerayमुंबई : शिवसेना सत्तेतील समसमान वाटपावरून आक्रमक झाली आहे. त्यावरून भाजपच्या गोटात धाकधूक वाढली असून, भाजपानेही त्यांच्या आमदारांची ३० तारखेला विधान भवनात बैठक बोलावली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. आजच मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाकडून सत्तेचं सूत्र लेखी स्वरुपात घ्यायचं यावर शिक्कामोर्तब झालं. तसंच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे अशीही मागणी विजयी आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली.
या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना भाजपा युती असूनही शिवसेनेच्या व भाजपच्या जागा कमी झाल्या आहे. विशेष म्हणजे शिवसेना निकालाच्या दिवसापासून आक्रमक झाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना अडीच अडीच वर्षे या फॉर्म्युलावर ठाम आहे. यामुळे भाजपला शिवसेनेच्या अटी मान्य कराव्या लागतील.
भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही बहुमतासाठी लागणारा १४५ आकडा भाजपाला गाठणं कठीण आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपाला जावं लागणार आहे.