महत्वाचे…
१. हिंद-प्रशांत महासागर सुरक्षेसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा २.जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे आणि व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन यांचीही भेट ३. पंतप्रधान मोदी आणि एन शुआन फुक यांनी दोन्ही देशांचे संबंध
मनीला :फिलीपीन दौर्याच्या तिसर्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये हिंद-प्रशांत महासागर सुरक्षेसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे आणि व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन यांचीही भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन शुआन फुक यांच्यात सुरक्षा क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्यसह इतर विषयांवर बातचीत करण्यात आली.
Wonderful meeting with PM @jacindaardern. We discussed deepening economic and cultural cooperation between India and New Zealand. pic.twitter.com/Du1vqgVNgW
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2017
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट करुन म्हटले आहे, ‘ही भेट सहकार्य आणि विविध विषयांवर चर्चा दर्शवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान मॅलकम टर्नबुल यांची मनीला येथे बैठक झाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.’
रविश कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘द्विपक्षीय चर्चेत संबंध आणखी दृढ होण्याच्यादृष्टिने बातचीत करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि एन शुआन फुक यांनी दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत होण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचा मुद्दा चर्चिला.’