महत्वाचे…
१.यंदाच्या मोसमात हा आजवरचा सर्वोच्च दर नोंदविण्यात आलाय. २. नॅशनल एग्ज कॉर्पोरेशन कमिटीने ३.५४० रूपये हा दर ग्राहकांपर्यंतचा
मुंबई : ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे‘ असं म्हणत प्रोटिनयुक्त असलेली अंडी खाण्यास उद्युक्त करणाऱ्या नॅशनल एग्ज कॉर्पोरेशन कमिटीने पुण्यात अंड्याचा आजवरचा सर्वाधिक दर घोषित केलाय. प्रति शेकडा अंड्यांचा दर आता ५४० रुपयांवर जाऊन पोहोचलाय. काल हा दर ५३० रूपये इतका होता. तर ५४० रूपये हा दर ग्राहकांपर्यंतचा आहे.
शेतकऱ्यांना हा दर ४८० रूपये प्रति शेकडा इतका जाहीर करण्यात आलाय. दरवर्षी थंडीच्या मोसमात अंड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ होत असते. यंदाच्या मोसमात हा आजवरचा सर्वोच्च दर नोंदविण्यात आलाय.