Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्यानेपाळ: पोखरामध्ये विमान कोसळून ३२ जण ठार

नेपाळ: पोखरामध्ये विमान कोसळून ३२ जण ठार

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरण (CAAN) नुसार, यति एअरलाइन्सच्या 9N-ANC ATR-72 विमानाने सकाळी १०.३० वाजता काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.

Nepal Plane Crash
Image: PTI

नेपाळच्या पोखरा विमानतळावर उतरत असताना नेपाळी प्रवासी विमान नदीच्या घाटात कोसळल्याने किमान ३२ लोक ठार झाले १० परदेशी लोकांसह ६८ प्रवासी आणि चार क्रू सदस्य असलेले ७२ आसनी प्रवासी विमान लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

विमानतळ सध्या बंद असून बचावकार्य सुरू आहे.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरण (CAAN) नुसार, यति एअरलाइन्सच्या 9N-ANC ATR-72 विमानाने सकाळी १०.३० वाजता काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.

यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, एटीआर ७२ यती एअरलाइन्सचे विमान जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन विमानतळादरम्यान कोसळले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये क्रॅश साइटमधून धुराचे लोट निघत असल्याचे दिसून आले आहे.

 

Web Title: Nepal: Pokharamadhe vimaan koslun 32 jan thar

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments